पी.टी.आय. , नवी दिल्ली - सोमवार, ६ फेब्रुवारी २०१२ गेल्या वर्षी भारताने जिंकलेल्या विश्वविजेतेपदात युवराज सिंगचा वाटा सिंहाचा होता. त्याच्या अष्टपैलू खेळाचे गारूड संपूर्ण विश्वचषक स्पध्रेत सर्वावर अधिराज्य गाजवत होते. पण विश्वचषक संपल्यानंतर दबक्या पावलांनी त्याच्या आजारपणाच्या चर्चा होत होत्या. मग त्याच्या फुप्फुसात गाठ झाल्याचे सुतोवाच करण्यात आले. परंतु क्रिकेटप्रेमींच्या या लाडक्या खेळाडूला कर्करोग झाल्याचे वृत्त रविवारी प्रकाशझोतात आले आणि सर्वानाच धक्का बसला. युवीवर सध्या अमेरिकेत केमोथेरपी सुरू आहे.
संमेलनाध्यक्ष डहाके यांचे परखड प्रतिपादन साहित्य संमेलनाची सांगता राखी चव्हाण/ज्योती तिरपुडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी, चंद्रपूर मराठीच्या मुद्यावर राज्यातील विद्यापीठांचे धोरण वेगवेगळे असल्यामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकवण्यासाठी या धोरणात एकसूत्रीपणा आणण्याची गरज आहे, असे रोखठोक प्रतिपादन चंद्रपूरच्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी रविवारी येथे केले.
पश्चिम रेल्वेवरील ‘डीसी ते एसी’ विद्युत परिवर्तन अखेर पूर्ण प्रतिनिधी, मुंबई विलेपार्ले ते चर्चगेट टप्प्यातील विद्युत यंत्रणेचे ‘डीसी’मधून ‘एसी’मध्ये (डायरेक्ट करंट टू अल्टरनेट करंट) परिवर्तन करण्याचे काम पूर्ण करून रविवारचा सहा तासांचा महामेगाब्लॉक पश्चिम रेल्वेने सत्कारणी लावला. या परिवर्तनामुळे उपनगरी गाडय़ांचा वेग ताशी १०० किलोमीटर इतका होणार असल्यामुळे रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.
कुठे आघाडी, कुठे बिघाडी, कुठे युती, तर कुठे महायुती.. खास प्रतिनिधी, मुंबई जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या प्रचाराची रविवारी सांगता झाल्यानंतर आता सारे पक्ष मुंबई व इतर महापालिकांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करतील. मुंबईसह सहा महापालिकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे, तर चार महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. भाजप, शिवसेना व रिपब्लिकन पक्षाची सात महापालिकांमध्ये असमाधानकारक महायुती झाली आहे.
पी.टी.आय., बंगळुरू अँट्रिक्स-देवासप्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांच्यासह तीन शास्त्रज्ञांना दोषी ठरविले आहे. या करारामध्ये पारदर्शकता नव्हती, असा ठपका या समितीने ठेवला आहे. माजी दक्षता आयुक्त प्रत्युष सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या स्मितीने हा अहवाल तयार केला आहे.
दुर्गम भागातील विक्रीचा समज ठरला खोटा ! देवेंद्र गावंडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी अपेक्षेहून कितीतरी जास्त गर्दीचा विक्रम नोंदविणाऱ्या येथील संमेलनात तब्बल तीन कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाल्याचा अंदाज प्रकाशकांच्या वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. येथील साहित्यप्रेमींनी दुर्गम भागात पुस्तक विक्री होत नाही, हा समज खोटा करून दाखविला आहे.अगदी पहिल्या दिवशीपासून संमेलनस्थळावर सुरू झालेला प्रेक्षकांचा ओघ आज शेवटच्या दिवसापर्यंत कायम होता.
पी.टी.आय., पणजी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने रविवारी सत्तारूढ काँग्रेस आघाडीचा पाठिंबा काढून घेतला. गोव्यातील विधानसभा निवडणुका ३ मार्चला होणार आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय पक्षाने घेतल्यामुळे हा पाठिंबा काढून घेण्यात आला आहे.
प्रतिनिधी, मुंबई दादर येथील पश्चिम रेल्वेच्या पाचव्या रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिघाड होऊन स्पार्किंगचे मोठे आवाज आल्याने घबराट उडाली. पुलावरील गर्दीत त्यामुळे धक्काबुक्की सुरू झाली होती.
उस्मानाबाद विठ्ठलाचे दर्शन घेऊन आंध्र प्रदेशात गावी परतणाऱ्या वारकऱ्यांची मालमोटार झाडावर आदळून झालेल्या अपघातात आठजण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
रेश्मा शिवडेकर - सोमवार, ६ फेब्रुवारी २०१२ reshma.murkar@expressindia.com आपले ज्ञान ‘अपडेट’ करण्यासाठी कारकीर्दीच्या विविध टप्प्यांवर प्रशिक्षणाची गरज कुठलाही संवेदनशील शिक्षक मान्य करेल, पण शिक्षक प्रशिक्षणाची ध्येय-उद्दिष्टे स्पष्ट नसणे, मार्गदर्शकांचे अपुरे ज्ञान, विनाकारण लांबलेली प्रक्रिया, सकारात्मक दृष्टिकोनाचा अभाव आदी कारणांमुळे ‘प्रशिक्षण’ नावाचे लोढणे दुसऱ्याच्या गळ्यात अडकविण्याकडेच बहुतांश शिक्षकांचा कल असतो.
शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२ तुम्ही आहात पूर्ण वेळ गृहिणी ? काय आहे तुमची मानसिकता आत्ता या घडीला? पूर्ण समाधानी की खंतावणारी भावना मनात आहे. तुलना होतेय तुमची करिअरिस्ट मैत्रिणीं, शेजारणीबरोबर की अभिमान वाटतोय तुम्हाला तुमच्या संसाराला छान आकार देता येतोय या बद्दल ?
मीना वैशंपायन , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२ chaturang@expressindia.com राजकारणातील स्त्री आरक्षणाचा तीव्र विरोध करणाऱ्या, स्त्रीमुक्ती चळवळीत सक्रिय न होणाऱ्या दुर्गाबाई भागवत स्त्रीच्या क्षमता व सामर्थ्यांबद्दल मात्र नेहमीच आश्वस्त असत. त्यांचं आयुष्य व त्यांचं साहित्य पाहिलं की लक्षात येतं की, दुर्गाबाई म्हणजे मुक्त स्त्रीत्वाचा दृश्य आविष्कार आहेत. दुर्गाबाईंच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यातल्या स्त्री जाणिवांविषयी...
छाया महाजन , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२ chaturang@expressindia.com शहरी स्त्रियांच्या मानसिकतेत परिवर्तन होत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. गृहिणीपदापलीकडे जाऊन काहीतरी केलं पाहिजे आणि आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र असलं पाहिजे ही मानसिकता तयार होतेय, कारण गृहिणीच्या कामाचं मोल केलं जात नाही. तिचे कष्ट गृहीत धरले जातात. स्त्रीची अस्मिता आता हे नाकारू लागली आहे.. संध्याकाळी रोजंदारीनं काम करणाऱ्यांचा वाटप होता. पुरुषाची मजुरी दिवसाला दीडशे रुपये आणि बाईची शंभर. तळहातावरच्या नोटेकडे पाहत एक बाई म्हणाली.
सविता नाबर , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२ chaturang@expressindia.com त्या बालवाडीचं नावच फुलोरा आहे. मुलांचं व्यक्तिमत्त्व फुलायला देणारी ही कोल्हापूरची शाळा. झाडावर चढायला शिकवणारी. कमळं पाहायला नेणारी, गुऱ्हाळ, बुरुडकाम दाखवायला नेणारी. मुलांचं अनुभवविश्व व्यापक करणारी.. माझ्या लहानपणी शाळेत एक नाटुकलं बसवलं होतं. त्याचं नाव होतं खा-खे-शा-न-गा. नाटकाचा उल्लेख नेहमी त्याच नावानं व्हायचा. खा, खेळा, शाळा नसलेलं गाव असा त्याचा लाँगफॉर्म होता. लहानपणी शाळा नसण्याची संकल्पना फारच छान वाटते ना? या सगळ्याच्या मुळाशी जाऊन बघितलं तर मुलांना बालवाडी का नको वाटते?
ओशो , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२ chaturang@expressindia.com मीराने सर्व सोडलं, तेव्हा सर्व मिळवलं. सर्व सोडून देत जाणाऱ्यांनाच सर्व मिळतं. कणभर जरी वाचवून ठेवलं तरी अडचणीचं होईल. रवींद्रनाथांची एक छोटीशी कविता आहे. एक भिकारी सकाळी आपल्या घरातून भीक मागण्यासाठी बाहेर पडला. पौर्णिमेचा दिवस होता. त्याला खूप आशा वाटत होती. ‘आज भरपूर मिळेल.’ जसं भिकारी करतात, घरातून निघताना झोळीत चार दाणे तांदळाचे घातले.
महेंद्र कानिटकर , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२ chaturang@expressindia.com आपली भावना समोरच्या व्यक्तीला लक्षात आली नाही, याचा त्या व्यक्तीला फार त्रास होतो. कारण नातं फुलवण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या भावना त्याच्या तीव्रतेनुसार जाणून घेणं, ही पहिली पायरी ठरते. पण आपल्या भावना योग्य पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचवणंही तितकंच महत्त्वाचं. पती-पत्नीच्या नात्यात तर जोडीदाराला नीट समजून घेऊन योग्य प्रतिसाद देणं ही कलाच मानली पाहिजे.
मिथिला दळवी , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२ chaturang@expressindia.com लैंगिकता शिक्षणाची मुलांची सुरुवात पालकांच्या स्वत:च्या लैंगिकतेविषयी दृष्टिकोनातून होते, असं म्हणतात. म्हणूनच आपलं लहानपणही पालकांनी आठवायला हवं. लहानपणी काही विषय हे ‘न बोलायचे, प्रश्न न विचारण्याचे’ असतात, हे आपल्याला कधी कळलं होतं? त्याबद्दल नंतरच्या आयुष्यात जरा जास्तच कुतूहल वाटलं होतं का? असे प्रसंग आठवून पाहायचा स्वाध्याय आई-बाबांनी करून पाहायलाच हवा...
मनीषा सोमण , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२ chaturang@expressindia.com कडाक्याची थंडी आणि काश्मीर यांचं जसं जवळचं नातं आहे तसंच घनिष्ठ नातं आहे काश्मीर आणि कावा यांचं. या चविष्ट कावा व इतर काश्मिरी पदार्थाविषयी... इतकी कडाक्याची थंडी पडली की, मला हटकून आठवण होते ती काश्मिरी कावाची. कावा म्हणजे काश्मिरी पद्धतीचा बदाम-केशर घालून केलेला चहा. इतकी अप्रतिम चव असते या चहाची की, एक-दोन ग्लास पिऊन पोट भरलं तरी समाधानच होत नाही.
वीणा गवाणकर , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२ chaturang@expressindia.com विन्नी मंडेलांच्या निमित्तानं माझं मत पुन्हा एकदा पक्क झालं की जिवंत व्यक्तीचं ‘चरित्र’ लिहू नये. शेवटच्या श्वासापर्यंत माणूस जगत असतो. त्या प्रवासात तो केव्हाही त्याचा सांधा बदलण्याची शक्यता असते. त्याचं वेगळं रूप समोर येऊ शकतं. पूर्वायुष्य आणि उत्तर आयुष्य यातून निर्माण होणाऱ्या प्रतिमा सारख्याच असतील, असं नाही. मग घाई का करा? केव्हातरी मधूनच घर नीट लावण्याची उबळ मला येते. बरेच दिवस साफसफाई करायची राहून गेलेली असते.
पूजा सामंत , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२ chaturang@expressindia.com परमेश्वराने स्त्रीला घडवताना विशेष गुणवत्ता दिल्या आहेत. तिने या बलस्थानांचा वापर केला तर नथिंग इज इम्पॉसिबल, सांगतेय प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक, लेखक, पटकथा लेखक, अभिनेत्री असं चतुरस्र करिअर करणारी शिवाय पत्नीपद आणि तीन मुलांचं आईपण सांभाळणारी फरहा खान. तिचा मंत्र आहे, एक्स्पेक्ट द अनएक्स्पेक्टेड... बॉलीवूडला आपल्या इशाऱ्यावर ‘नाचवायला’ आरंभ करत फरहा खानने आपल्या नृत्य दिग्दर्शन कारकीर्दीचा श्रीगणेशा केला तेव्हापासून सुसाट सुटलेल्या फरहाला थांबवणं कुणालाही शक्य झालेलं नाहीये.
अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२ ( ५ ते ११ फेब्रुवारी २०१२) मेष : प्रगतीचा पर्वकाळ सूर्य, मंगळ, गुरू, शनी अशा ग्रहांचे राशी कुंडलीस मिळणारे वरदान म्हणजेच आपल्या प्रगतीचा पर्वकाळ. शनिवापर्यंत कार्यचक्र वेगाने फिरत राहणार आहे. त्यातील काही प्रसंग, काही संधी यशस्वी कृतीची प्रसिद्धी करतील. त्याचा लाभ व्यापक प्रमाणात उठवता येईल. शुक्रवारचे बुध राश्यांतर केंद्रबिंदू ठरावे. व्यापार भरभराटीला येईल, राजकीय प्रतिष्ठा वाढेल, शिक्षणात प्रगती होईल, प्रापंचिक प्रश्न सुटतील, नवे प्रस्ताव विचारात घेता येतील. अष्टमात राहू, व्यवस्थानी शुक्र निष्कारण अस्वस्थता निर्माण करतात. विचलित होऊ नका, पुढे चला. दिनांक : ५, ८, ९, १० शुभ काळ. महिलांना : प्रपंचातले प्रश्न सुटतील, समाजात प्रभाव वाढेल, असंतुष्टता परिमित त्रास देतील. वृषभ : समन्वयातून सफलता गुरू, शनी, मंगळ व्यत्ययांचे रूपांतर विघ्नांमध्ये करू शकतात. कृतीत संयम, शब्दात विनय यांचा समन्वय ठेवला तर भाग्यातील रवी, बुध, मीन, शुक्र अनुकूल राहू समन्वयाचे रूपांतर यशामध्ये करू शकतात. शुक्रवारच्या बुध राश्यांतराच्या आसपास त्याचा विशेष प्रत्यय यावा. नोकरी, उद्योग, उधारी, महत्त्वाचे करार, भेटी-चर्चा यांचा समावेश त्यात करता येईल. शुक्र-हर्षल युती होत असताना प्रलोभने मिळणाऱ्या यशावर बरेचसे पाणी फिरवू शकतात एवढे लक्षात ठेवा आणि कृती करा. दिनांक : ५, ६, ७, ११ शुभ काळ. महिलांना : सामोपचारातून प्रकरणे सोडवता येतील. मिथुन : त्रास पचवता येईल मिथुन राशी कुंडली गुरू, मंगळ, शनी यांनी प्रबळ केलेली असल्याने कार्यपथावरील प्रवास कमी-अधिक वेगाने सुरूच राहणार आहे. मीन शुक्रामुळे त्यात उत्साह राहील. काही उपक्रम प्रतिसादासाठी आकर्षक करू शकाल, त्यातून आर्थिक प्रश्न सुटतील, राजकीय प्रतिष्ठा वाढेल, व्यापारी उलाढाल प्रभावी ठरेल. शुक्रवारी बुध भाग्यात येतोय. व्यवहारातील अधिकाधिक मार्ग निर्वेध होऊ लागतील. अनिष्ट रवी, राहू, केतू यांच्यातून होणारा त्रास सहज पचवता येईल. दिनांक : ६ ते १० शुभ काळ. महिलांना : समीकरणे सुटतील, सफलता व्यापक होईल. कर्क : समन्वयातून सफलता भाग्यात शुक्र, दशमात गुरू, अनुकूल रवी, मंगळ निर्णय- योजना- कृती यांच्यात समन्वय साधण्यास सहकार्य करतील. त्यातून सफलता सोपी होईल. शनिवापर्यंत आपण असलेल्या क्षेत्रात कमी-अधिक प्रचीती येत राहावी. चतुर्थात असलेला शनी, शुक्रवारचे बुध राश्यांतर आणि शुक्र-हर्षल युती यांनी प्रचीतीमध्ये व्यत्यय आणू नये यासाठी सत्य, संयम यांचा उपयोग करा. नोकरी, धंदा, राजकारण, कलाप्रांत यामध्ये त्याचा मोठा फायदा होईल, प्रवास कराल. दिनांक : ६ ते १० शुभ काळ. महिलांना : निर्धार आणि सत्य यशासाठी निश्चित उपयुक्त ठरतील. अवघड प्रश्नही सुटतील. सिंह : यश मिळणार आहे राशीस्थानी मंगळ, पराक्रमी शनी, भाग्यात गुरू यांच्या परिणामातून यश मिळणार आहे; परंतु चतुर्थात राहू, अष्टमात शुक्र आणि शुक्र-हर्षलाची युती यांच्यामुळे यशाचे प्रमाण चुकू नये एवढीच काळजी ठेवावी. त्यात प्रलोभन, वाद, स्पर्धा यांच्यापासून दूर राहाणे आवश्यक आहे. त्यामुळे ठरवलेले उपक्रम पूर्ण करता येतील. शिक्षण, व्यापार, राजकारण यामध्ये प्रगती होईल, सांसारिक समस्या सोडवता येतील. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल. दिनांक : ८ ते ११ शुभ काळ. महिलांना : संपर्क आणि संधी यांचा उपयोग करा. नेत्रदीपक यश मिळेल. कन्या : संधीचा उपयोग करा साडेसाती, अष्टमात गुरू, बारावा मंगळ या ग्रहांमुळे प्रयत्न, हुशारी यांचा सहज उपयोग होईल आणि यश मिळेल याचा भरवसा नाही. परंतु असा काळ थोडाच असल्याने कार्यचक्र फिरवतच ठेवा. सूर्य, शुक्र, राहू यांच्या सहकार्याचा त्यासाठी उपयोग होईल, अशुभ पर्व हळूहळू संपवता येईल. भागीदार, सहकारी, परिवारातील मंडळी यांना सध्या नाराज करू नका. सामोपचाराने प्रकरणे मिटवता येतील. त्यासाठी संधीचा उपयोग करा. प्रवास होतील, मंगलकार्य ठरेल. दिनांक : ५, ६, ७, ११ शुभ काळ. महिलांना : वादग्रस्त समस्यांमधून मार्ग शोधावे लागतील. तूळ : असंतोषाचा काळ साडेसाती, चतुर्थात रवी, नाराज शुक्र यांच्यातील प्रतिक्रिया परिवार ते व्यवहार यामध्ये असंतोष निर्माण करू शकतात. शुक्रवारच्या शुक्र-हर्षल युतीच्या आसपास चमत्कारिक प्रसंग निर्माण होतील. कसलाही धोका स्वीकारू नका आणि त्वरित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करा. गुरुकृपा, मंगळाचे सहकार्य, अनुकूल राहू प्रतिष्ठेला धक्का बसू देणार नाहीत. शासकीय प्रकरणे, राजकीय वाद, लिखापढीचे व्यवहार यात घाईगर्दीची कृती नको. शक्यतो प्रवास नको. दिनांक : ६ ते १० शुभ काळ. महिलांना : अवघड प्रश्न, अवघड उत्तर असा सध्या ग्रहकाळ आहे. वृश्चिक : विलंब आहे, पण यश मिळेल बारावा शनी, षष्टात गुरू यांच्यामधून उपग्रहात व्यत्यय येत राहतील, त्यामुळे कार्य आणि समय यांचा समन्वय अवघड आहे. परंतु राशीस्थानी राहू, पराक्रमी रवी, पंचमात शुक्र उपक्रमांवर अपयशाची सावली पडू देणार नाहीत. नोकरी, धंदा, राजकारण, ठरणारी मंगलकार्ये, भेटी-चर्चा यामध्ये रागरंग बघून झटकन पुढे सरकाल. शुभ चंद्रभ्रमणामुळे बाजी मारून जाता येईल असा काळ आहे. दिनांक : ६ ते १० शुभ काळ. महिलांना : झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्या. धनू : यश व्यापक होईल लाभात शनी, पंचमात गुरू, भाग्यात मंगळ यांच्यातून विचारांना वेग मिळेल. कर्तृत्वाच्या अनेक बाजू प्रकाशात येतील आणि अनेक क्षेत्रांतील प्रतिष्ठित मंडळी आकर्षित होतील. नवे भारदस्त व्यवहार, प्रस्तावही समोर ठेवले जातील. याचा लाभ उठवून यश व्यापक करता येईल. व्यवहार, राजकारण, कला, साहित्य, शिक्षण या क्षेत्रात स्वत:चा मजबूत प्रभाव निर्माण करू शकाल. राहू, केतू त्रास देतील, पण त्यांची चिंता नको. दिनांक : ८ ते ११ शुभ काळ. महिलांना : प्रयत्नाने प्रगतीचे चित्र आकर्षक करू शकाल. मकर : पुढे सरकत राहाल सूर्य, बुध, शुक्र, शनी अशा ग्रहांची अनुकूलता मकर व्यक्तींना प्रगतिपथावरून पुढे पुढे घेऊन जाणारच आहे. चतुर्थात गुरू, अष्टमात मंगळ असल्याने कोठेही निष्कारण ठेच लागू नये एवढीच दक्षता शनिवापर्यंत ठेवली तर निर्दोष यशाचा आनंद मिळवता येईल. काही प्रांतांत तर प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून आपली प्रशंसाही होऊ शकेल. त्यात राजकारण, शिक्षण, विज्ञान, व्यापार या विभागांतील मंडळींचा समावेश राहील. दिनांक : ६, ७, ११ शुभ काळ. महिलांना : व्यत्यय टाळा, यश मिळवा हा मंत्र लक्षात ठेवा. कुंभ : समन्वय पक्का पराक्रमी गुरू, सप्तमात मंगळ, भाग्यात शनी, दशमात राहू प्रयत्न आणि प्रगती यांचा समन्वय पक्का झालेला आहे. त्यावर कोणताही विरोधक वार करू शकणार नाही. त्यामुळे व्यापारी प्राप्ती, राजकीय प्रतिष्ठा, अभिनय, कला आविष्कार, साहित्याचे विषय, संशोधन कार्य यामधून कुंभ व्यक्ती झगमगत राहतील. शुक्रवारी शुक्र-हर्षल युती आहे. यशाचा आनंदोत्सव व्यसन, प्रलोभन यामध्ये फसू देऊ नका. त्यातून शासन फटका देईल, शत्रू संधी साधतील त्यासाठी सावधानता आवश्यक. दिनांक : ५, ८, ९, १० शुभ काळ. महिलांना : संसार आनंद देईल, समाजात सन्मान मिळेल, शुभकार्य ठरेल, आरोग्य सुधारेल. मीन : प्रभाव वाढेल, सावध राहा राशीस्थानी शुक्र, अनुकूल गुरू, राहू, लाभात सूर्य प्रयत्नातून प्रश्न सुटतील आणि प्रगतीचे मार्ग निर्दोष होत राहतील. त्यामुळे व्यापार, नोकरी, राजकारण, कलाविश्व या केंद्रांवर मीन व्यक्तींचा प्रभाव वाढलेला असेल. अष्टमातील शनीमुळे आरोग्याच्या तक्रारी आणि शासकीय नियम यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. षष्ठातील मंगळ शत्रूंचा बंदोबस्त चोख ठेवतो. परंतु कडक शिस्तीशिवाय शुक्र-हर्षल युती प्रलोभनातून सुटका करीत नाही, तेवढे फक्त सांभाळा. भेटी चर्चेतून शाब्दिक घोटाळा टाळा. बुध व्यवस्थानी येत आहे. दिनांक : ६, ७, ११ शुभ काळ. महिलांना : वाद, स्पर्धा टाळा, प्रयत्न कारणी लागतील.