सोलापूर - सोलापूर-हैदराबाद रस्त्यावर आज (रविवार) दुपारी दीडच्या सुमारास नळदुर्गजवळ ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात सात जण ठार आणि सहा जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरहून कर्नाटककडे ट्रकमधून (क्रमांक एमएच १२ एफ ८८३९) हे सर्वजण निघाले होते. नळदुर्गपासून तीन किमी अंतरावर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक झाडावर आदळला. या अपघातात सात जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. जखमींना सोलापूरमधील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मदतकार्य वेगाने सुरु असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पतियाळा - काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी असलेले अभिनेते ओम पुरी यांनी अण्णा हजारे यांना अशिक्षित आणि दिशाहीन असल्याचे म्हटले आहे. ओम पुरी यांनी अण्णांच्या मोहिमेला योग्य म्हटले असले तरी, अण्णांना चार जणांकडून खेळविले जात असल्याचे सांगितले. येथील राजपुरामध्ये कार्यक्रमात बोलताना ओम पुरी म्हणाले, ''अण्णा हजारे प्रामाणिक असून, एक चांगले व्यक्ती आहेत. मात्र, त्यांचे शिक्षण कमी झाले आहे. फक्त प्रामाणिक असून उपयोग नाही, त्यासाठी काही तरी व्हिजन समोर असले पाहिजे. अण्णांनी संसदेचा सन्मान केला पाहिजे. अण्णांच्या आजूबाजूला असलेल्या मोजक्या चार व्यक्तींबरोबरच त्यांनी इतरही काही शिक्षीत लोकांना भेटले पाहिजे.'' रामलिला मैदानात अण्णा हजारे उपोषणाला बसले असताना ओम पुरी यांनी त्यांचे समर्थन करीत मंत्र्यांना भ्रष्ट आणि अशिक्षित असे संबोधले होते. त्यावेळी अनेक खासदारांनी नाराजी दर्शवित त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकार नोटीस पाठविली होती.
वॉशिंग्टन - सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकला शनिवारी आठ वर्षे पूर्ण झाली. फेसबुकचे सध्या ८० कोटी ४५ लाख युजर्स जगभरात आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यात १०० कोटींचा आकडा पार करण्याची कंपनीची योजना आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी ४ फेबुवारी २००४ मध्ये फेसबुकला सुरुवात केली होती. झुकेरबर्ग यांच्यासह एड्युर्डो सेवरीन, डस्टीन मोस्कोविट्झ आणि ख्रिस ह्युज या तिघांचा समावेश होता. सुरुवातीला फेसबुक हे फक्त हार्वर्ड विद्यापीठापुरते मर्यादीत होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या वाढत्या पाठींब्यामुळे फेसबुकचे जाळे इतर महाविद्यालये आणि विद्यापिठात पसरत गेले. अखेर ४ फेब्रुवारी २००८ मध्ये फेसबुक हे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना खुले करण्यापूर्वी 'दफेसबुकडॉटकॉम' असे याचे डोमेन नाव होते. मात्र, नंतर ते बदलून फेसबुक असे करण्यात आले. सध्या फेसबुकने शेअऱ बाजारात कंपनीची नोंद केली आहे. तसेच झुकेरबर्ग हा जगातील पाचवा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
चाळीसगाव - चाळीसगाव - धुळे रस्त्यावर दसेगाव फाट्याजवळ आज (रविवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात दोन जण ठार आणि तिघे जण जखमी झाले. चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा येथून ट्रॅक्टरचा चालक कैलास चव्हाण विनोद चव्हाण, प्रवीण बाबूराव चव्हाण, सागर चव्हाण यांच्यासह चाळीसगावकडे येत होते. दसेगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टर चालक कैलाससह ट्रक चालक जागीच ठार झाले. तर ट्रॅक्टरवरील तिघेही जण जखमी झाले आहेत. त्यांना शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आज (रविवार) सकाळी बर्फवृष्टी झाल्यामुळे तसेच शुक्रवारपासून प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने तापमान कमी झाले आहे. तसेच, आज सलग दुसरया दिवशी बर्फवृष्टी आणि दरड कोसळल्याने 300 किलोमीटर पसरलेला श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.   रस्त्यांवर तसेच झाडांवर सर्वत्र बर्फ साठला असून, आज तापमान उणे 0.1 अंश सेल्सिअस झाले आहे. काल शनिवारी उणे 0.3 अंश सेल्सिअस इतके होते. हवामान खात्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हे तापमान नेहमीपेक्षा निश्र्चितच कमी असून, ते अजून जास्त उणे होण्याची शक्यती वर्तवली जात आहे. चार फेब्रुवारीला आतापर्यंतचे सर्वात कमी म्हणजे उणे 7.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. त्यावेळी दाल तलाव आणि इतर तलाव बर्फाने आच्छादले गेले होते. रस्ते घसरडे झाल्याने आज रस्त्यांवर अतिशय कमी गाड्या धावताना दिसल्या.
नवी दिल्ली - भारतीय संघातील फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. युवराजचे फिजिओ जतिन चौधरी यांनी त्याला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट केले आहे.   एका वृत्तवाहिनीशी बोलताना चौधरी यांनी त्याचा कॅन्सर गंभीर नसल्याचे म्हटले आहे. सध्या त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरु असून, किमोथेरेपी करण्यात आली आहे. त्याच्यावर मार्चपर्यंत किमोथेरेपी करण्यात येणार आहे. तसेच त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात येणार नाही. युवराज यामुळे अनेक काळ क्रिकेटपासून दूर राहणार असून, तो मे महिन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. युवराज २६ जानेवारीला अमेरिकेला उपचारासाठी रवाना झाला होता. ऑक्टोबरच्या अखेरीस युवराजला कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले होते. कॅन्सर पहिल्या टप्प्यात असताना माहिती झाल्याने उपचार करणे शक्य झाले आहे. तो लवकरच ठीक होईल. त्यापूर्वी एका वृत्तपत्राने युवराजच्या फुफ्फुस आणि हृदयाच्यामध्ये ट्युमर असल्याचे वृत्त दिले होते. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यानच युवराज सिंगला त्रास होण्यासा सुरुवात झाली होती. अनेकवेळा त्याला खोकल्याचा त्रास होत होता.
बंगळुरू - अँट्रिक्स-देवास करारावर विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने इस्त्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांच्यासह तिन शास्त्रज्ञांनी दोषी ठरविले आहे. यापूर्वी माधवन नायर यांच्यासह तिघांना कोणत्याही सरकारी पदावर नियुक्ती करण्यास मनाई करण्यात आली आहे. माजी दक्षता आयुक्त प्रत्युष सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार अँट्रिक्स-देवास करारामध्ये पारदर्शकता नाही. नायर, ए. भास्करनारायणन, के. आर. श्रीधर मूर्ति आणि के. एन. शंकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्वजण नोकरीतून निवृत्त झालेले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) अँट्रिक्स ही व्यावसायिक संस्था आहे. अँट्रिक्स आणि देवास यांच्यामध्ये झालेल्या कराराची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने शनिवारी रात्री आपला अहवाल दिला.
मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली पायाच्या दुखापतीमुळे सहा आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. या दुखापतीमुळे ब्रेट ली भारत आणि श्रीलंकेबरोबर होत असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतून आणि आगामी वेस्टइंडीज दौऱ्यालाही मुकणार आहे. भारताविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ब्रेट लीच्या उजव्या पायाचे हाड तुटले होते. त्यामुळे त्याला सहा आठवडे क्रिकेट खेळण्यापासून दूर रहावे लागणार असल्याचे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर ट्रिफोर जेम्स यांनी सांगितले. ब्रेट लीचे हाड तुटल्याचे एक्स रे केल्यानंतर स्पष्ट झाले. आज (रविवार) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामना होत असून, ब्रेट लीच्या जागी संघात कोणाची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या जलद गोलंदाजीची धुका मिचेल स्टार्क, रायन हॅरिस, क्लिंट मॅके यांच्यावर असणार आहे.
मुंबई - मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये शनिवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. मात्र, आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण समजू शकलेले नाही. गेल्या दोन महिन्यांपूर्वी याच भागात आग लागली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीने पूर्ण परिसर व्यापला होता आणि परिसरातून धुराचे लोट येत होते. अग्निशामन दलाच्या जवानांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
उद्धव यांचा राजवर हल्ला - कृपाशंकर यांच्या ताब्यात नाही देणार मुंबई मुंबई - मनसे..."मला मुळातच त्याविषयी बोलण्याची गरज वाटत नाही. चायनीज खेळणी टिकतात काय?'' अशी विचारणा करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी "राज ठाकरे यांचे आव्हानच नाही,' असे ठणकावून सांगितले. शिवाय मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई कृपाशंकर सिंह यांच्या ताब्यात मुंबईकर जनता देणार नाही, असा ठाम विश्वासही व्यक्त केला. मुंबई महापालिकेची निवडणूक विकास या एकमेव मुद्द्यावर आम्ही लढणार असल्याचे घोषित करत नगरपालिकांच्या सामन्यात काही त्रुटी राहिल्या, असेही त्यांनी मान्य केले. "मुंबईतील सत्ता टिकवणे हे आपल्या कारकीर्दीतले सर्वात मोठे आव्हान आहे काय,' असे विचारता ते म्हणाले, "" प्रत्येकच निवडणुकीच्या वेळी "उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची ही "ऍसिड टेस्ट' आहे,' अशा बातम्या प्रसिद्ध होतात,' आता मला या प्रकाराची सवय झाली आहे.'' महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर "सकाळ'ला खास मुलाखत देताना ते बोलत होते. प्रश्न - मुंबईतील सत्ता शिवसेनेचा प्राण आहे.
पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुणे जिल्ह्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. विरोधकांना राष्ट्रवादीच्या या कामगिरीबाबत काहीच बोलता येणे शक्य झालेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर व्यक्तिगत टीका करण्याकडे विरोधकांचा कल आहे. जनता सुज्ञ आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमच्या पक्षाची कामगिरी अव्वल राहील, यात कोणतीही शंका नसल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.  जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या धामधमुमीत त्यांनी "सकाळ'शी संवाद साधला. या वेळी झालेली प्रश्नोत्तरे पुढीलप्रमाणे.  प्रश्न- राष्ट्रवादी कॉंग्रेसची कामगिरी तुम्ही मतदारांपुढे मांडत आहात. मतदार या कामगिरीवर खरेच खूष आहेत का?  उत्तर- नक्कीच. गेल्या काही वर्षांत राज्यात व जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मोठ्या प्रमाणात निधी ग्रामीण भागासाठी खर्च केला आहे. पुण्यातील जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 50 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणला. खासदार आणि आमदारापेक्षाही हे काम मोठे झाले आहे.
लिहिण्याची कल्पना छान आहेच पण आपण इथं जमलेल्या सर्वांनी महिन्याला पन्नास-शंभर रुपये वर्गणी काढून या मुलीचं शिक्षण पूर्ण केलं तर? सर्वांत जास्त आनंद आपल्याला होईल... आपण एक आयुष्य उभं केलं, ज्योत नव्हे तर फ्लड लाइटच लावला, असं समाधान आपल्याला मिळेल. गावानंच आपल्या गावातील पोरगी घडवली, हेही मोठ्या अभिमानानं सांगता येईल... बघा, विचार करा... तो तुम्हाला पटला तर मी माझ्या शंभर रुपयांपासून सुरवात करेन. नाशिकपासून शंभर, दीडशे किलोमीटरवर असलेल्या मारुतीपाड्याला 12 जानेवारीला निघालो होतो. कळवण तालुक्यातील अभोणा या गावापासून कितीतरी कोसावर मारुतीपाडा... वीस-पंचवीस घरांचा... कुठल्यातरी डोंगराच्या कुशीत बिचकत बिचकत वसलेला... या पाड्यावर विश्वनाथ नावाचा 15 वर्षांचा मुलगा त्याच्या कुटुंबासह राहतोय... दहाव्या इयत्तेत शिकतोय... मधाच्या पोळ्यातील (आग्या मध नव्हे, पहाडाला लाकडाला चिकटलेला मध) नेमकी राणीमाशी पकडण्यात तो तरबेज आहे, असं कुणीतरी मला फोनवरून सांगितलं होतं. "फिरस्ती' वाचणारा हा युवक असावा. अलीकडे याबाबत खूप फोन येतात. फर्माईश होते. अमुक कोणीतरी प्रेमात पडलाय, लग्न कसं करावं हा त्याच्या समोरचा प्रश्न आहे.

गोंडा - राज्याच्या राजकारणात गेल्या चार वर्षांत अचानक अवतीर्ण झालेल्या डॉ. मोहम्मद अयुब यांच्या "पीस पार्टी'ने सत्ताधारी बहुजन समाज पक्षाबरोबर समाजवादी पक्ष, कॉंग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांची झोप उडविली आहे. निवडणूक निकाल काहीही लागोत परंतु बड्या राजकीय पक्षांची समीकरणे घडविण्याची आणि बिघडविण्याची क्षमता पीस पार्टीत नक्कीच असेल. मतविभागणीस कारणीभूत ठरून प्रमुख पक्षाच्या एखाद्या मोहऱ्याला तोंडघशी पडण्याची क्षमता या पक्षाकडे आहे. निवडणूक मैदानात अक्षरशः कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे शेकडो छोटे पक्ष उतरले आहेत. परंतु सर्वाधिक चर्चा आहे ती पीस पार्टीच्या वाढत्या प्रभावाची! पहिल्या टप्प्यात 8 फेब्रुवारीला मतदान होणाऱ्या पूर्व उत्तर प्रदेशमध्ये त्यातही गोंडा, बस्ती, सिद्धार्थनगरसह सुमारे 15 जिल्हे या पक्षाचे प्रभावक्षेत्र मानले जाते. "सप' आणि "बसप'सह कॉंग्रेस आणि भाजपला पीस पार्टी अडचणीत आणू शकते. व्यवसायाने सर्जन असलेल्या डॉ. अयुब यांना "गॉड सेव्हिअर' मानले जाते. गोरगरीब आणि अडचणीतील रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिल्याने त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे.
नवी दिल्ली - स्पेक्ट्रम प्रकरणी चिदंबरम यांच्याबाबतचा बहुचर्चित निकाल आल्यानंतर ऐन दुपारी राजधानीत राजकीय वारे जोराने वाहू लागले. कॉंग्रेस नेत्यांच्या वाणीला तर "बहर'च आला. आनंदाच्या भरात त्यांनी चक्क "सत्यमेव जयते' अशा धर्तीच्या प्रतिक्रिया दिल्याने त्या चर्चेचा विषय ठरल्या. हा निर्णय सकाळी साडेदहाला लागणार असल्याचे यापूर्वी जाहीर झाले होते. प्रत्यक्षात न्या. सैनी यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास सुब्रमण्यम स्वामींची याचिका फेटाळणारा निकाल दिला. अलीकडच्या काळातला हा सर्वाधिक उत्कंठापूर्ण खटला असल्याने पतियाळा हाउस न्यायालय परिसराला माध्यमांचा सकाळपासूनच वेढा पडला होता. दिल्लीत पुन्हा जोर धरलेल्या थंडीत वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, त्यांचे कॅमेरामन यांच्याबरोबरच पत्रकारांचा त्यात समावेश होता. न्या. सैनी यांच्या दालनात निवडक पत्रकारांनाच प्रवेश मिळाला. स्वतः सुब्रमण्यम स्वामीही बराच वेळ बाहेर होते. प्रत्यक्ष निकालाचे वाचन करण्याआधी काही मिनिटे त्यांना न्यायमूर्तींनी बोलावून घेतले. सकाळी साडेदहाचा काटा जवळ येऊ लागला तशी उत्कंठा वाढू लागली.
मुंबई - भारतीय क्रिकेट मंडळ आणि आमच्यातील संबंध तुटेपर्यंत ताणले गेले, त्यामुळे "सहारा' कायम ठेवणे शक्य नव्हते. इतकेच नव्हे तर इतरही मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. इतरांसाठी नियमात अपवाद करण्यात आले. आम्हाला मात्र न्याय देण्यात आला नाही, असे किती वेळ सहन करायचे, अशा शब्दांत नाराजी जाहीरपणे मांडत "सहारा'चे प्रमुख सुब्रोतो रॉय यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) काडीमोड घेतला. नवा प्रायोजक मिळेपर्यंत सहाराचा "टेकू' भारतीय संघाला असणार आहे मात्र "पुणे वॉरियर्स' संघ विकायला काढून त्यांनी आयपीएलशी असलेले नाते क्षणार्धात तोडून टाकले. गेल्या कित्येक वर्षांपासून असलेले प्रायोजकत्व काढून घेण्याचा निर्णय "आयपीएल 5' मोसमासाठी पुरवणी लिलाव सुरू होण्याच्या केवळ काही तासच अगोदर "सहारा'ने घेतला आणि भारतीय क्रिकेटमध्ये जोरदार भूकंप झाला. "आयपीएल'चा लिलाव बंगळूरमध्ये वेळेत सुरू झाला पण त्यामध्ये "सहारा'चा समावेश नव्हता. त्यानंतर दुपारी सुब्रोतो रॉय यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन "बीसीसीआय'कडून मिळालेल्या वागणुकीचा पाढाच वाचला. आजारी असलेला युवराज सिंग यंदाच्या "आयपीएल'साठी उपलब्ध नाही.

चंद्रपूर  - येथे सुरू असलेल्या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आणि खुले अधिवेशन उद्या (ता. 5) सायंकाळी सहाला होईल. या समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आहेत. तसेच सिनेअभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगावकरही यावेळी उपस्थित राहतील. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके असतील. यावेळी स्वागत समितीच्या वतीने हृदयनाथांचा सत्कार केला जाईल. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहतील, असे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आचारसंहितेमुळे ते येतील की नाही, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. सायंकाळी आठला हृदयनाथ मंगेशकर यांच्या "भावसरगम' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात आज -मुलाखत ः सकाळी 9.30, कविवर्य फ. मु. शिंदे -परिसंवाद ः दुपारी 12 वाजता, ""मराठीच्या दुरवस्थेला प्रसारमाध्यमेसुद्धा कारणीभूत आहेत काय?'' -परिसंवाद ः दुपारी 12 वाजता, ""मराठीचे संवर्धन यापुढे बोलीभाषाच करतील.'' -कविसंमेलन ः दुपारी 2.30, अध्यक्ष : डॉ. विठ्ठल वाघ.
माझ्या पीएने मला ज्या इमारतीत नेलं होतं त्या इमारतीचं नाव विश्रामगृह असं होतं. मला उगाचच लाक्षागृह आठवलं. या इमारतीत विश्राम करण्यासाठी मात्र कोणी येत नसणार. तिथल्या वातावरणात आढळणारे सूक्ष्म भावनांचे तरंग मी वाचू लागलो. विश्रामगृहातून राजकारण, विश्वासघात, व्यभिचार, पैसा, मद्यपान, राजकीय बैठका, कार्यकर्ते व स्वीय सहायक म्हणवणाऱ्या अर्धशिक्षित व अर्धसुसंस्कृत अशा धूर्त लोकांच्या टोळ्यांच्या मनातले संमिश्र भाव- भयगंड अशा विविध गोष्टींचे तरंग वातावरणातून बाहेर येत होते. आम्ही आतल्या आरामशीर अशा खोलीत बसून राहिलो. मी विचारलं, ""आपण इथं राहणार का?'' ""मी तुमची इथं व्यवस्था केली आहे!... झालंच तर एक गाडी दिमतीला असेल!'' ""मला आजचा माणूस कसा जगतो हे खरं तर पाहायचं आहे!'' ""मग तुम्हाला आमच्या राजकारणात सगळंच पाहायला मिळेल!... इथले आमदार कृष्णाजी तुम्हाला भेटायला येणार आहेत!.... इतक्या लवकर आपल्याला यश मिळेल असं वाटलं नव्हतं. आमदारसाहेब घाबरले आहेत.

नवी दिल्ली - टू जी स्पेक्ट्रम गैरव्यवहारात गृहमंत्री पी. चिदंबरम यांना सहआरोपी करण्याची मागणी विशेष न्यायालयाने आज फेटाळून लावली. त्यानंतरही केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चिदंबरम यांच्याविरुद्ध या प्रकरणात "गुन्हेगारी कृत्याचा' पुरावाच हाती लागला नसल्याचा पुनरुच्चार केला. चिदंबरम हे तत्कालीन अर्थमंत्री असून, स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया त्यांच्या संमतीशिवाय शक्यच नव्हती व एकट्या राजा यांचे हे कामच नाही, अशी भूमिका भाजपपासून द्रमुकपर्यंत मांडली जाते. न्यायालयाने प्रतिकूल निकाल दिल्यानंतर स्वामी यांनी वरच्या कोर्टात जाण्याचे निश्चित केले आहे. मात्र, चिदंबरम यांच्या सहभागाचे पुरावेच नसल्याचा "सीबीआय'चा पुनरुच्चार महत्त्वपूर्ण मानला जातो. "सीबीआय' सूत्रांनी सांगितले, की स्पेक्ट्रम वाटप निर्णय व व्यवहारात चिदंबरम यांच्याविरुद्ध कोणताही "गुन्हेगारी आरोप' सिद्ध होण्यासारखे पुरावे नाहीत. अगदी भाजपच्या काळापासूनच वादग्रस्त स्पेक्ट्रम प्रकरण खणून काढणाऱ्या "सीबीआय'ने सारे लिखित-मुद्रित व ध्वनिमुद्रित पुरावेही गोळा केले आहेत हे येथे लक्षणीय. 17 मार्चला या प्रकरणी पुढची सुनावणी होत आहे.
नवी दिल्ली - स्पेक्ट्रम गैरव्यवहारात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सहआरोपी करण्याची मागणी करणारी सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका "सीबीआय' न्यायालयाने फेटाळल्याने कॉंग्रेसने याबाबत बेफाम आरोप करणाऱ्या भाजपकडून जाहीर माफीची मागणी केली. चिदंबरम यांच्यावरील भ्रष्टाचार आरोपांचा मुद्दा सोडणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले. न्यायालयाने स्वामींची याचिका फेटाळल्यावर कॉंग्रेसमध्ये "सुटके'चे, तर भाजपमध्ये "निराशे'चे वारे वाहू लागले. डाव्या पक्षांनी न्यायालयाच्या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केले. "माकप'ने म्हटले आहे, की तेव्हा अर्थमंत्री असलेले चिदंबरम स्पेक्ट्रम प्रकरणापासून अलिप्त कसे राहू शकतात? चिदंबरम हे दोषी आहेतच. वरच्या न्यायालयात चिदंबरम यांचा दोष सिद्ध होईल एवढा पुरावा स्वामींकडे असल्याशिवाय ते दावा दाखल करणारच नाहीत. कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी भाजपच्या असभ्य भाषेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून, आजच्या निकालानंतर भाजपने देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. चिदंबरम यांच्याविरुद्ध भाजपने जो पूर्वग्रहदूषित व विषारी प्रचार केला त्यामुळे देशाची प्रतिष्ठा खालावल्याचा दावाही त्यांनी केला.
मुंबई - जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षांचे नेते आणि ती सत्ता आपल्या हाती यावी, यासाठी विरोधी पक्षांचे नेते यांनी हेलिकॉप्टर, खासगी विमाने आणि मोटारीने अक्षरश: हजारो किलोमीटरचे अंतर तुडवत शेकडो सभा घेतल्या आहेत. राज्याच्या ग्रामीण भागातील पक्षाची पाळेमुळे अधिक मजबुत व्हावीत, यासाठी या नेत्यांनी केलेल्या धावपळीनंतर तेथील मतदार काय कौल देतात, हे मंगळवार, 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानातून स्पष्ट होणार आहे. प्रचाराचा धुरळा उद्या, रविवारी दुपारी खाली बसेल. त्याआधीच जमेल तितक्या जास्त सभा घेण्याचा नेत्यांचा प्रयत्न असेल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे दोघे राज्यभर छोटी विमाने आणि हेलिकॉप्टर्सद्वारे कॉंग्रेसच्या प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, गृहमंत्री आर. आर. पाटील हेही हवाई दौरे करीत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी बहुधा प्रचाराच्या निमित्ताने प्रथमच महाराष्ट्र पिंजून काढला असावा.
बंगळूर - सहारा परिवारने भारतीय क्रिकेटला "बेसहारा' केल्याच्या "ब्रेकिंग न्यूज'च्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या पाचव्या पर्वाचा लिलाव सुरू झाला. अपेक्षेप्रमाणे अष्टपैलू रवींद्र जडेजासाठी जोरदार रस्सीखेच झाली, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरलेला आणि आयपीएलच्या सुरवातीचा "ऑयकॉन' खेळाडू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याचा अपेक्षाभंग झाला. जडेजा टी-20 स्पेशालिस्ट असल्याने त्याची कामगिरी प्रभावी असल्यामुळे त्याला "डिमांड' होता. चेन्नई सुपर किंग्ज आणि डेक्कन चार्जर्समध्ये त्याला पटकावण्यासाठी चुरस झाली. जडेजाची आधारभूत किंमत एक लाख डॉलर होती. चेन्नईने लिलावासाठी असलेल्या कमाल निधीचा दोन दशलक्ष आकडाच बोली म्हणून लावला. अखेर टायब्रेक झाला आणि त्यात चेन्नईचीच सरशी झाली. जडेजा नेमका किती डॉलरनी मालामाल झाला हा आकडा मात्र जाहीर करण्यात आला नाही. जडेजाशिवाय लिलावामध्ये दोन खेळाडूंना दहा लाख डॉलरपेक्षा जास्त रक्कम मिळाली. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज माहेला जयवर्धने याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1.4 दशलक्ष डॉलरमध्ये घेतले, तर बंगळूरने आर. विनयकुमारसाठी दहा लाख डॉलर मोजले.
अहमदाबाद - गुजरातमध्ये यंदा विक्रमी उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले. राज्यात आणि मुख्यत: सौराष्ट्रात कांदा दोन रुपये प्रतिकिलो अशा मातीमोल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे नैराश्यापोटी शेतकऱ्यांनी आपला कांदा फेकून देण्यास सुरवात केली आहे. राज्यात या वर्षी बटाट्याप्रमाणेच कांद्याचेही वारेमाप पीक आले. काही दिवसांपूर्वीच सौराष्ट्रातील दिसा येथील शेतकऱ्यांनी आपला बटाटा कवडीमोल भावात विकावा लागत असल्यामुळे रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. अशीच परिस्थिती आता कांदा उत्पादकांवर आली आहे. भावनगर जिल्हा कांदा उत्पादनात अव्वल आहे. या जिल्ह्यातील महुवा येथील बाजार समितीत वीस किलो लाल कांद्यासाठी शेतकऱ्यांना केवळ चाळीस ते साठ रुपये, तर पांढऱ्या कांद्यासाठी शंभर ते 120 रुपये मिळत आहेत. महुवा बाजार समितीत रोज पन्नास किलोच्या तब्बल एक लाख गोण्या येत असल्याचे बाजार समिती सदस्य प्रवीण कथिरिया यांनी सांगितले. कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी आम्ही एका बिघ्यासाठी चाळीस हजार रुपये खर्च केले. यातून आम्हाला दोन हजार किलो कांदा उत्पादित झाला.
सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी सामान्यांचा सहभाग वाढला पाहिजे. म्हणूनच आपला आवाज व्यक्त करण्याची संधी मतदारांनी दवडता कामा नये. राज्यातील 27 जिल्हा परिषदा आणि 309 तालुका पंचायत समित्यांसाठी उद्या (मंगळवार) मतदान होणार आहे. त्याद्वारे या 336 स्थानिक स्वराज्य संस्थांवर 6 हजार 137 सदस्य निवडले जातील. त्यापैकी 3 हजार 78 महिला असतील. झेडपी आणि पंचायत समित्या म्हणजे धोरणात्मक निर्णय न घेणारी मात्र विकासकामांची अंमलबजावणी करणारी लोकशाही शासनव्यवस्थेतील सर्वांत मोठी यंत्रणा आहे. वर्षाला सुमारे 16 हजार कोटी रुपये या यंत्रणा चालविण्यासाठी खर्च करण्यात येतो आणि 81 हजारांहून अधिक कर्मचारीवर्ग यात सहभागी असतो. या यंत्रणेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी गेले दोन आठवडे विविध पक्ष कशा पद्धतीने या निवडणुका लढताहेत, हे मतदारांनी पाहिलेच आहे. आता त्याचा विचार करूनच मतदारांनी कौल द्यावा. विविध सोळा प्रकारच्या सोयी-सवलती आणि विकासाची कामे करणारी ग्रामपंचायत तसेच शेकडो योजना राबविणाऱ्या जिल्हा परिषदा कितपत सक्षम आहेत, हा प्रश्नच आहे.
पाणी हा सामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय परंतु धोरण तयार करताना यात लोकांचाच सहभाग नसतो. प्रस्तावित धोरणच्या मसुद्यात समस्यांची जंत्री आहे पण सोडवणुकीचा तपशील नाही. पाणी, त्याचा वापर याविषयीच्या "नव्या, सुधारित प्रस्तावित' राष्ट्रीय धोरणाचा मसुदा अलीकडेच केंद्रीय जलखात्याने जाहीर केला. त्यात सुधारणा सुचविण्याची तारीख आहे जेमतेम एका महिन्याच्या अंतराची 29 फेब्रुवारी 2012. मसुदा वाचल्यावर अनेक गोष्टी आधीच ठरलेल्या वाटतात. तरीही जलतज्ज्ञ, सेवाभावी संस्था, शेतकऱ्यांच्या संघटना, असंघटित वर्ग, किनारी बांधव, आदिवासी या सर्वांनीच तो समजून घेऊन त्यातल्या त्रुटी जलखात्याला वेळेत कळवणे अत्यावश्यक वाटते. ग्रामसभा पातळीपर्यंत पोचून नागरिकांना विश्वासात घेऊन हा मसुदा बनवला गेलेला नाही, हे निश्चित. सरकारच्या म्हणण्यानुसार, पंचायती राज्याच्या सभासदांसह सल्लामसलतीच्या चार फेऱ्यांनंतर (फक्त!) हा मसुदा प्रकाशित केला आहे. मुळात "आमंत्रितां'बरोबर घेतलेल्या अशा बैठका आणि जाहीर, सार्वजनिक, सर्व घटकांच्या प्रतिनिधींनी मांडलेले विचार, त्यातून आलेल्या सूचना यातला फरक सुजाण नागरिकांना कळतो.

स्पेक्ट्रम प्रकरणाच्या फेऱ्यात अडकलेले गृहमंत्री पी. चिदंबरम यांना कनिष्ठ न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, या निकालामुळे सर्व प्रकरणाची जबाबदारी ए. राजा यांच्यावर ढकलणाऱ्या "यूपीए' सरकारला नैतिकतेच्या पातळीवर "क्लीनचिट' मिळालेली नाही. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासंदर्भात कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय अनपेक्षित नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने "टू जी स्पेक्ट्रम'प्रकरणी 122 परवाने रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयातून त्याचे काहीसे सूतोवाच झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना "स्वच्छतापत्र' (क्लीन चिटचे स्वैर रूपांतर) दिले होते. तसेच तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाही दोषमुक्त केले होते. न्यायालयाच्या निर्णयाचाच संदर्भ येथे देणे अधिक उचित ठरेल. ""मंत्रिगटाने केलेल्या आणि मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या शिफारशींनुसार दूरसंचार विभागाने स्पेक्ट्रमविषयी अर्थ मंत्रालयाबरोबर चर्चा करणे बंधनकारक ठरविण्यात आले होते.
हुंड्यांसाठी होणारा विवाहितांचा छळ व हुंडाबळी रोखण्यासाठी कायदा झाला व त्यानुसार दाखल झालेल्या खटल्यांत दोषींना कठोर शिक्षाही झाल्या पण तरीही हुंड्यांसाठी छळाच्या घटना व हुंडाबळींची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे या संदर्भात अधिक कठोर पाऊल उचलताना सर्वोच्च न्यायालयाने अशा खटल्यातील दोषींना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावता यावी, म्हणून त्यांच्यावर खुनाचा आरोप ठेवावा, असे आदेश सुमारे दोन वर्षांपूर्वी कनिष्ठ न्यायालयांना दिले. तरीही परिस्थितीत फरक पडल्याचे दिसत नाही. हौस, मानपान, रुखवत आदी गोंडस नावाखाली बहुतांश विवाहांमध्ये आजही हुंडा उकळला जातोच. भोजनावळी, वरात आदींचा भुर्दंड वधूपक्षाला सहन करावा लागतो, तो वेगळाच. हौसेचे कारण सांगत संपत्तीच्या प्रदर्शनासाठी आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनेच्या आहारी जाऊन प्रसंगी वधूपक्षाकडूनही सढळ हातांनी पैसा खर्च केला जातो. विवाहसोहळ्यातील उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी भोजनावळी व अन्य भपक्यावरील खर्च आणि कुटुंबाचे उत्पन्न यांची सांगड घालण्याची शिफारस नियोजन मंडळाच्या उच्चस्तरीय गटाने केंद्र सरकारला केली आहे.
होस्नी मुबारक सत्तेवरून जाऊन वर्ष झाले, तरी स्थैर्याची चिन्हे नाहीत. फुटबॉल मैदानावरील हिंसाचाराने इजिप्तच्या स्थितीचे गांभीर्य प्रकर्षाने समोर आले आहे. हुकूमशाहीकडून लोकनियुक्त शासनपद्धतीकडे संक्रमण करू पाहणाऱ्या इजिप्तला फुटबॉल मैदानावरील हिंसाचाराच्या घटनेने एक धोक्याचा कंदील दाखविला आहे. अस्थिरतेची किंवा अराजकाची परिस्थिती निर्माण झाली, की दंडुकेशाहीशिवाय देशाचा गाडा चालविता येत नाही, असे म्हणणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तींना बळ मिळते. जवळजवळ 30 वर्षे एकतंत्री राजवट चालविणाऱ्या होस्नी मुबारक यांना लोकशाहीसाठी झालेल्या आंदोलनामुळे सत्तेवरून दूर व्हावे लागले असले, तरी त्यांच्या सत्ताकाळात सर्व तऱ्हेचे फायदे मिळविणारा वर्ग निश्चितच अस्वस्थ असणार. फुटबॉल मैदानावरील हिंसाचाराच्या घटनेमागे त्या शक्ती नसतीलच, असे नाही. अनेकांनी तसा आरोपही केला आहे. त्याची सत्यासत्यता चौकशीत बाहेर येईल परंतु इजिप्तच्या उत्तर भागातील पोर्ट सैद येथे दंग्याचा भडका ज्या रीतीने उडाला, तो प्रकार भीषण होता. मैदानावर मृत्यू जणू धावत होता.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुंबईकरांच्या तक्रारीचा सूर लागू द्यायचा नसेल, तर मुंबई आणि मुंबईतील नागरी सुविधा यापेक्षा अस्मिता आणि भाऊबंदकीचे मुद्देच शिवसेनेला हाती घ्यावे लागतील. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंमधील जुगलबंदीमुळे महाराष्ट्र रंगून जाईल, अशी अपेक्षा होती पण घडले भलतेच. जी अपेक्षा ठाकरे बंधूंनी पूर्ण करायला हवी होती, त्याची जबाबदारी अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री नारायण राणे आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतली. तीही मुंबईबाहेर, जिल्हा परिषदेच्या आखाड्यात. त्यामुळे, मुंबईकरांना पुणे, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्याकडे कान देऊन बसावे लागले. दोन्ही ठाकरेंना जिल्हा परिषदांत फारसा रस नाही. त्यांची सगळी ताकद महापालिका निवडणुकीतच कामी येणार. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे असले, तरी "2014 मध्ये मंत्रालयावर भगवा फडकविण्या'चे स्वप्न पाहणारे उद्धव ठाकरे यांनी आणि "जनतेने एकदा तरी संधी द्यावी,' अशी वारंवार अपेक्षा व्यक्त करणारे राज ठाकरे यांनी या निवडणुकांकडे पाठच फिरवली.

गिरीशपेक्षा दोन दशकं लहान असूनही मी त्याला अरे-तुरेच करत असे. अनेक तरुणांच्या आयुष्याला त्यानं एक दिशा दिली होती. त्याच्या कामाकडे पाहून अनेक तरुण चांगल्या नोकरीवर पाणी सोडून समाजोपयोगी काम करण्यासाठी "प्रयास'मध्ये आले. मीही त्यातलाच. दर वेळेला त्याच्याशी चर्चा करताना जाणवायचं, की तो नेहमीच आपल्या एक पाऊल पुढे जाऊन विचार करतो. आपण एखाद्या मुद्द्यावर बोलत असताना त्याचा त्या मुद्द्याविषयीचा विचार पूर्ण झालेला असे. तो मूळचा ठाण्याचा. मुंबई आय.आय.टीमधून बी.टेक. आणि एम.टेक.झाला. मुळात कार्यकर्त्याचा पिंड असलेला गिरीश नोकरी-धंद्यात रमणं शक्यच नव्हतं. त्यानं लगेचच ऊर्जा प्रश्नावर स्वतंत्रपणे काम करायला सुरवात केली आणि काही सहकाऱ्यांबरोबर 1994 मध्ये "प्रयास ऊर्जा गटा'ची स्थापना केली. त्याच वेळी ऊर्जा धोरणांमध्ये काही मूलगामी बदल होऊ लागले होते. खासगीकरण, उदारीकरणाचे वारे वाहू लागले होते. या बदलांचा समाजाच्या विविध स्तरांवर कसा परिणाम होणार आहे याचं विश्लेषण प्रथम "प्रयास'च्या गिरीश संत, शंतनू दीक्षित आणि सुबोध वागळे या त्रिकुटानं केलं.
मंथन साहित्य संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षीय भाषणाचा अंश. जोवर मराठीच्या विविध बोली बोलल्या जात आहेत, प्रमाण मराठीत शिक्षित लोक आपले व्यवहार करीत आहेत, मराठी माध्यमांच्या शाळा बहुसंख्येने आहेत, तोपर्यंत मराठी भाषा टिकून राहण्याचे उपाय करणे शक्य आहे. मराठीला पर्याय म्हणून इंग्रजीची (आणि माहिती-तंत्रज्ञानाची, इलेक्ट्रॉनिक्सची) निवड करण्याचा विकल्प आपण ठेवतो, तेव्हाच मराठीचे स्थान दुय्यम कसे आहे, हे आपण दाखवीत असतो. या विषयाचा स्वीकार करूनही मराठी हा विषय अनिवार्य असलाच पाहिजे, असे धोरण आखले पाहिजे आणि त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. गेली काही वर्षे मराठीची गरज कशी नाही याचा वृत्तपत्रांतून प्रचार करण्यात गेलेली आहेत. विशेषतः विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधल्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर "मराठी नको' या मताचा प्रभाव टाकण्यात आलेला आहे. पुढे तर प्रश्नच नाही. भाषेचा किंवा साहित्याचा वाराही लागू नये, अशीच व्यवस्था केलेली आहे. आपण पहिलीपासून दहावीपर्यंत मराठीचा आग्रह धरलेला आहे. अकरावीपासून मराठी विषय सोडला तरी चालेल, अशी व्यवस्था केलेली आहे. हे योग्य नाही.
"तुजवीण सख्या रे'मधील अगदी मॉडर्न मुलगी आणि आता "पुढचं पाऊल'मधील टिपिकल गृहिणी अशा परस्परविरोधी भूमिका लीलया साकारणाऱ्या जुई गडकरीने रसिकांच्या मनात आपले स्थान भक्कम केले आहे. उच्चविद्याविभूषित असलेली जुई सध्या मुंबईत राहत असली तरी ती मूळ कर्जतची. तिथे त्यांचा मोठा वाडा होता. कालौघात आता तेथे अपार्टमेंट झाले असले तरी कर्जतच्या घराला जुई कधीच विसरू शकत नाही. त्या घराबद्दलचे तिचे मनोगत... कर्जतमध्ये आमचं मोठं घर आहे. मी लहान असल्यापासून त्या वाड्याबद्दल माझ्या खूप आठवणी आहेत. आता वाडा राहिला नसला तरी तेथेच आमचे एकत्र घर आहे. त्या जागी अपार्टमेंट आहे आमच्या घरात जी खिडकी आहे त्यातून बाहेरचा निसर्ग बघणे हा माझा छंद आहे. दिवसाचा बराच काळ मी या खिडकीपाशी बसून राहू शकते. या घरातील माझे सर्व नातेवाईक म्हणजे माझी काकू आणि अन्य मंडळी यांच्याबरोबरचा काळ हे सगळचं अनोखं आहे. मी लहान असताना मला सगळे जण विविध प्रकारच्या बाहुल्या आणत असत, या बाहुल्या आणि आणि वेगवेगळ्या प्रकारची टेडिबेअर मला आवडतात ती या घरात आजही जपून ठेवलेली आहेत, माझ्याकडं किमान 150 बाहुल्या आणि टेडिबेअर आहेत. कर्जतला गेले, की मी नॉस्टाल्जिक होते.
मुंबई - बॉलिवुडमध्ये सध्या दबक्या आवाजात चर्चा चालू आहे, ती करीना कपूरची. अलिकडेच एका प्रसिद्ध दैनिकाने करीना एका विमानतळावर आलेली असताना, एका दैनिकाच्या छायाचित्रकाराने तिचे छायाचित्र टिपले. आपली छाबी कोणी टिपत असल्याची तिला कल्पनाच नव्हती. मात्र ते प्रसिद्ध झाल्यापासूनच दबक्या चर्चेला उधाण आले आहे. ही चर्चा आहे ती गर्भवती असल्याची. खरेच गर्भवती आहे काय? विमानतळावर आलेल्या करीनाने हिरव्या रंगाचा लांब टीशर्ट घातला होता. या लांब टी शर्टाआड काही तरी दडविण्याचा तिचा आटोकाट प्रयत्न चालू असल्याचे तिच्या हावभावावरून दिसून येते. हे काहीतरी दडविण्यासाठी तिने अंगावरून एक शालही पांघरली होती. ही शालही अशा प्रकारे तिने अंगावर घेतली होती, की आपण गर्भवती असल्याचे कोणालाही समजू नये! करीना आणि सैफ अली खान यांचा येत्या १० फेब्रुवारीला साखरपुडा होण्याची शक्यता आहे. योगायोगाने याच दिवशी करीना आणि इम्रान खान यांची प्रमुख भूमिका असलेला 'एक मै और एक तू' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे.
देसी बॉईजमध्ये अक्षय आणि जॉनने मेल स्ट्रिपर्सची भूमिका केली होती. आता बॉलिवुडमध्येही अशा भूमिकांना चांगलाच वाव मिळू लागलाय. बॉलिवूडचा आणखी एका स्टार, असा बोल्ड रोल करण्यासाठी सज्ज झाला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा देसी बॉईज या सिनेमात अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमने मेल स्ट्रिपर्सची भूमिका केली होती.   आता रणदीप हूडाही काहीशा अशाच भूमिकेत दिसणार आहे. मात्र, रणदीप हा जॉन आणि अक्षयच्या एक पाऊल पुढे गेलाय. कारण रणदीप आपल्या आगामी सिनेमात मेल प्रॉस्टिट्यूटची म्हणजेच जिग्लोची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचं नाव आहे 'मायानगरी'. त्याचं दिग्दर्शन करताहेत सतीश कौशिक. सिनेमात रणदीपची लीडिंग लेडी आहे माही गिल. गंमतीची गोष्ट ही आहे, की मायानगरीतलं हे कॅरेक्टर रणदीपच्या रिअल लाईफशी जोडले गेले आहे.बॉलिवुडमध्ये येण्याआधी जिग्लो व्हायची इच्छा होती. रिअल जरी नसला तरी रील लाईफमद्ये त्याला हा चान्स मिळालाय. मायानगरी हा सिनेमा प्रसिद्ध लेखक सुरेंद्र वर्माच्या 'दो मर्दो के लिए गुलदस्ता' या पुस्तकावर आधारित आहे.
अनंत महादेवन आता घेऊन येतायत स्टेईंग अलाईव्ह हा सिनेमा. ज्यात ते स्वतः दिग्दर्शनासोबतच अभिनयही करणार आहेत. हा सिनेमा म्हणजे एक डार्क कॉमेडी असेल. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा एकाला मरणाची भीती आहे, तर दूसऱ्याला त्याची सवयच झाली आहे. एका रुग्णालयात या दोन्ही पात्रांची भेट होते. एक आहे पत्रकार तर दुसरा अंडरवर्ल्ड डॉन. या दोघांची ओळख होते रुग्णालयातील बेडवर, जिथे हे दोघे एकाच आजाराशी लढत असतात. मरणाला जीवन लाभले यावर स्टेईंग अलाईव्ह हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय अनंत महादेवन यांनी. या डार्क कॉमेडीत अनंतला साथ मिळाली आहे सौरभ शुक्लाची. तो या सिनेमात एका गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसेल. स्टेईंग अलाईव्हमध्ये नवनी परिहार ही सौरभच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. जीवनाचं सत्य उलगडणारा हा सिनेमा आज काही मर्यादित चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा सिनेमा एक्सपेरिमेंटल जॉनरच्या धर्तीवर आहे. सिनेमात कोणतीही पॉप्युलर स्टारकास्ट नाहीय. त्यामुळे या सिनेमातल्या कॅरेक्टर्सचा अभिनय आणि सिनेमाची कथा, हेच मुख्य आकर्षण ठरणार आहे.
मुंबई- अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया हे आज (शुक्रवार) ग्रॅंड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी 12 च्या सुमारास विवाहबद्ध झाले. शाही विवाहाला चित्रपटसृष्टीबरोबरच राजकीय नेतेही उपस्थित होते. रितेशची वरात ग्रॅंड हयाच्या मैदानातून दिमाखात वरात काढण्यात आली होती. यावेळी त्याने पांढरा शेरवानीवर लाल फेटा परिधान केला होता. यावेळी नववधू जेनेलियाही साडी, नथ, मुंडावळ्यामध्ये ती शोभून दिसत होती. संपूर्णपणे महाराष्ट्रीयन पद्धतीने विधीसहीत हे लग्न पार पडले. लग्न सोहळ्याला बॉलिवूडमधील शाहरुख खान, गौरी खान, अजय देवगण, काजोल, अभिषेक बच्चन, जया बच्चन, शाहीद कपूर, अक्षय कुमार, आशिष चौधरी, साजिद खान, असीन, करण जोहर, जॅकी श्रॉफ व आशुतोष गोवारीकर तर राजकीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार त्याशिवाय छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, कृपाशंकर सिंह, हर्षवर्धन पाटील, सुशील कुमार शिंदे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे हे राजकीय नेते उपस्थित होते. लग्नानंतर लगेचच रितेशने मि.अँड मिसेस देशमुख असं ट्विट करून, लग्नाचा फोटो टाकला.

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळी भारताबरोबरच परदेशातही चित्रीकरणासाठी पोहोचलेली आहे. कित्येक चित्रपटात स्वीत्झर्लंड, लंडन, इटाली, अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे विविध देश आपण पाहिलेले आहेत. पाकिस्तानातही काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. परंतु अलीकडच्या काळात तेथील एकूणच कायदा-सुव्यवस्था पाहता कोणताही चित्रपट निर्माता-दिग्दर्शक पाकिस्तानमध्ये चित्रीकरण करण्याचे धाडस दाखवीत नाही. परंतु राकेश ओमप्रकाश मेहरा आपल्या आगामी "भाग मिल्खा भाग' या चित्रपटाचे चित्रीकरण भारत-पाकिस्तान बॉर्डरवर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा "भाग मिल्खा भाग' हा चित्रपट बनवीत आहेत. या चित्रपटाची कथा मिल्खा सिंग यांच्या सत्य घटनेवर आहे. ही घटना या चित्रपटात तंतोतंत येण्यासाठी पाकिस्तानजवळील एका गावात श्री. मेहरा यांना आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याची इच्छा आहे. कारण खऱ्या मिल्खा सिंग यांचा जन्म अशाच एका गावात झाला होता. याबाबत राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणाले, ""एकिकडे चित्रीकरणासाठी परदेश वाऱ्यांचा ट्रेण्ड हिंदी चित्रपटसृष्टीत आला आहे.
मुंबई -मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत गेली कित्येक वर्षे काम करणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आता वेगळी इनिंग खेळणार आहे. "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' या चित्रपटाद्वारे ती दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. "शेजारी शेजारी', "लपंडाव', "क्षण' या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सचिन पारेकरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बदलत चाललेल्या लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट असेल. चित्रपटाची कथा स्वतः मृणालने लिहिली आहे, तर पटकथा-संवाद मनीष रोकडे यांचे आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षापासून मृणालने अभिनयात पाऊल ठेवले. त्यानंतर विविध भूमिकांनी तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मराठी टीव्ही-चित्रपट, हिंदी टीव्ही-चित्रपट अशा सर्व माध्यमांमध्ये तिने वावर केला. आता मृणालने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. कॉलेजमधील एकांकिकांचे दिग्दर्शन केल्यावर मृणाल पहिल्यांदाच चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' या चित्रपटाचे काम प्राथमिक स्तरावर सुरू झाले आहे.
मुंबई - "अग्नीपथ' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी संजय दत्त याने दिलेल्या पार्टीत, फराह खानचा पती शिरीष कुंदर याने शाहरुख खान याला उद्देशून अपशब्द वापरले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या किंग खानने त्याला थप्पड मारली होती. मंगळवारी संध्याकाळीच त्यांच्यातील वाद संपला असल्याचे, त्या दोघांचा मित्र साजिद नडियादवाला याने सांगितले. या घटनेनंतर पार्टी संपल्यावर शाहरुख खानच्या घरी जाऊन साजिद आणि शिरीष यांनी हा वाद मिटविला. या संदर्भात फराह खानशी बोलताना फराह म्हणाली, "ओम शांती ओम' चित्रपटाच्या दरम्यान देखील त्या दोघांचे संबंध चांगले होते. त्यांच्या "पॅच अप'मुळे फराहनेही आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाहरुख खानची पत्नी गौरी देखील या प्रकरणामुळे नाराज असली, तरी तिने संयम पाळला होता. शिरीष कुंदर याने काही घडलेच नाही असे दाखवून, "अशा किरकोळ गोष्टी पार्टीमध्ये घडतात. मद्याच्या अंमलाखाली असल्याने आम्ही एकमेकांशी असे बोललो', असे शिरिषने स्पष्ट केले.